Nilesh Ghaywal : घायवळ प्रकरणी आरोपांची माळ, कोण घायाळ? Special Report
abp majha web team | 10 Oct 2025 10:18 PM (IST)
पुण्यातील गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि सचिन घायवळ (Sachin Ghaywal) बंधूंच्या प्रकरणांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यात आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव आल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. 'आमचा निलेश घायवळ अमरावती जेलमधून सुटावा यासाठी रोहित पवार यांनीच प्रयत्न केले होते,' असा खळबळजनक दावा घायवळच्या मामांनी केला आहे. दुसरीकडे, पुणे पोलिसांनी घायवळ बंधूंवर कारवाईचा बडगा उगारला असून, एका बांधकाम व्यावसायिकाला पिस्तूल दाखवून धमकावत त्याच्या १० फ्लॅटवर कब्जा केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोथरूड गोळीबाराचा संबंध नसल्याचा दावा घायवळच्या वकिलांनी केला आहे. तर, रोहित पवारांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावत, भाजप माझ्या कुटुंबाला बदनाम करत असल्याचा पलटवार केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.