Sachin Yadav Ghatkoper Hoarding : दीड वर्षांपूर्वी लग्न, 4 महिन्याचं बाळ; सचिनसोबत नियतीचा खेळ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : जीव जायचाच असेल तर तो कसाही जातोच... काळाने गाठलंच असेल तर त्यातून काहीच सुटका नाही. काही ना काही निमित्त येतं आणि नियती आपला डाव साधते. घाटकोपरच्या दुर्घटनेत सचिन यादव नावाच्या युवकाला असंच काळाने गाठलं. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत सचिन यादव या तरुणाचा करुण अंत झाला. दीड वर्षांपासून छेडानगर परिसातील पट्रोल पंपावर कामावर असणारा सचिन होर्डिंग कोसळण्याच्या अगदी 10 मिनिटेच आधी तिथे आला होता आणि त्याला जीव गमवावा लागला. सचिनच्या आयुष्यातील ती शेवटची दहा मिनिटं हादरवणारी आहेत. कामावर येण्याची वेळ आणि अपघाताची वेळ जुळून आली... तिथेच 20 वर्षांच्या सचिनचा दुर्देवी अंत झाला.
सोमवारी दुपारी पावसाचे ढग जणू काही मृत्यूच घेऊन आले होते. पावसाने मुंबईची दाणादाण उडाली होती. कुठे पाऊस, कुठे वारा, कुठे धुळीचं वादळ, सारं काही हादरवणारं घडत होतं. 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या धुळीच्या वादळाचा मोठा तडाखा बसला.