Ganeshotsav 2021 : POP गणेशमूर्तींचं विसर्जन करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सरिता कौशिक | 26 Aug 2021 10:25 PM (IST)
गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे आणि नागपूर खंडपीठाने पीओपी मुर्तींबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. गणेशोत्सवासाठी तुम्ही पीओपी मुर्ती खरेदी केली असेल तर त्या मुर्तींचं विसर्जन करता येणार नाही. पीओपी मुर्ती केवळ शोभेच्या वस्तू म्हणून विक्री करता येईल असा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे.