Ganesh Visarjan 2021 : Ganesh Galli च्या राजाला साधेपणाने निरोप, मंडळाचा आदर्श पायंडा ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2021 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जात आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र, कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच करावा लागत असल्याने भक्तांचा काहीसा हिरमोड झालेला पहायला मिळाला. किमान पुढच्या वर्षीतरी अशी परिस्थिती नसावी असच मागणं यंदा बाप्पाकडे गेलं आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.