Bhandup Fire | भांडुप पंपिंग स्टेशनजवळ खारफुटीच्या झुडपांना आग, आग लागली की लावली गेली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2021 08:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या खारफुटीच्या जागेवर गेल्या तीन तासापासून आग लागली आहे. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर नवघर जवळ मोठ्या प्रमाणत धुराचे साम्राज्य पसरले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलीस देखील ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या भूखंडावरून विजेच्या मोठ मोठ्या तारा देखील जात असल्याने आग लवकरात लवकर नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. या मोकळ्या भूखंडावर वारंवार अश्या प्रकारे आग लागत असल्याने यातून संशयाचा धूर देखील येत आहे. सध्या जर ही आग नियंत्रणात आली नाही तर मात्र याचा परिणाम पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर होण्याची शक्यता देखील आहे.