Fatima Shaikh Savitribai Phule : सावित्रीबाईंची सखी सत्य की कल्पित? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या शिक्षण कार्यात फातिमा शेख यांची मोलाची साथ होती असं काही इतिहास संशोधक मानतात.. फातिमा शेख यांचा ओझरता उल्लेख सावित्रीबाईं फुलेंनी लिहिलेल्या पत्रात एके ठिकाणी आढळतो. मात्र केंद्र सरकारच्या माहिती आंणि प्रसारण विभागाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी फातिमा शेख या अस्तित्वातच नव्हत्या आणि त्यांचा इतिहासातील उल्लेख कपोलकल्पित असल्याचा दावा केलाय. फातिमा शेख यांच्या १९४ व्या जयंतीच्या दिवशीच त्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय .
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातील भिडे वाड्यात एक जानेवारी १८४८ ला देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली.
फुले दांपत्याच्या या क्रांतिकारी कार्यात गेल्या काही वर्षात आणखी एक नाव जोडलं गेलं...
ते नाव म्हणजे फातिमा शेख..
सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंसोबत दलित आणि मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रयत्न करणाऱ्यात फातिमा शेख यांचा मोठा वाटा होता... असं काही लेखक संशोधक मांडतात..
फातिमा शेख यांच्या अस्तित्वावरुन वाद पुन्हा वर डोकं काढू पाहतोय.. त्याला कारण आहे दिलीप मंडल यांचं ट्विट.. दिलिप मंडल केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागात सल्लागार आहेत.. फातिमा शेख हे काल्पनिक पात्र असल्याचं त्यांनी सांगितलंय.. एवढंच नाही तर आपणच या पात्राची निर्मिती केली असा दावाही त्यांनी केला.. तो सुद्धा फातिमा शेख यांच्या जयंतीचा मुहुर्त साधत..
महात्मा फुल्यांबद्दल आदर, जिव्हाळा असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपुल लेखन केलं, हजारो भाषणं केली, पण एका शब्दानेही फातिमा शेख यांचा उल्लेख केला नाही अशी मांडणी प्राध्यापक मंडल यांनी केली आहे. फातिमा शेख यांचा उल्लेख पुस्तकातून काढून टाकावा अशी मागणी विवेक विचार मंचच्या तुषार दामगुडे यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या बरोबरीने फातिमा शेख यांचं नाव जोडलं जात आहे. त्यांचं कार्य खरंच तेवढं मोठं असेल.. आणि त्याचे पुरावे उपलब्ध असतील तर फातिमा शेख यांचा सन्मान व्हायलाच हवा.
पण त्यांच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्यांच्या शंकांचं समाधान होईल याकडेही लक्ष दिलं तर ती त्या महापुरुषांनी केलेल्या संघर्षाला, उपसलेल्या कष्टाला आणि केलेल्या आभाळाएवढ्या कार्याला आदरांजलीच ठरेल.