Pawar Stand Special Report : दिलगिरीनंतरही पवार भूमिकेवर ठाम, अजितदादांची मनधरणी, पवार ठाम?
abp majha web team | 16 Jul 2023 11:21 PM (IST)

मुंबईत सध्या पावसाचं वातावरण आहे... वातावरणात बऱ्यापैकी गारवा आहे... आजचा रविवारही लोक पावसाच्या आनंदात आणि गटारीच्या उत्साहात साजरा करत होते... आणि वाय. बी. चव्हाण सेंटरला अचानक लगबग वाढली... अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली... इतकंच काय तर, दिलगिरी व्यक्त करत पवारांच्या पायाही पडले... मात्र राष्ट्रवादीत बंडाचा बॉम्ब फोडल्यानंतर, दादांच्या आजच्या शिष्टाईचा अर्थ काय आणि थोरले पवार अजितदादांचं ऐकणार का? असे प्रश्न आता फेर धरू लागलेत..