मराठी रंगभूमी दिनाला नाट्यगृहाचे दरवाजे उघडले, कलाकार, तंत्रज्ञ, व्यवस्थापकांसाठी भावनिक क्षण!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2020 06:35 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे : पुण्यातल्या भरत नाट्यमंदिराचे कर्मचारी असलेले राम काकांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. आज त्यांची लगबग सुरु होती. मागच्या 8 महिन्यांपेक्षा आजची सकाळ त्यांचासाठी वेगळी होती. लाॅकडाऊनच्या काळात सगळं बंद असताना, नाट्यगृह परत कधी सुरु होईल याची कल्पनाही नसताना रामकाका रोज नेटाने भरत नाट्य मंदिर स्वच्छ करायचे. त्यांची इच्छा एकच होती. नाटकांच्या प्रयोगासाठी आपलं नाट्यगृह नेहमीच तयार असलं पाहीजे.