'त्या' 12 सदस्यांच्या निवडीचा प्रश्न पंतप्रधान दरबारी, मुख्यमंत्र्यांची राज्यपालांबाबत तक्रार
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
09 Jun 2021 12:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Thackeray Meets PM Modi : शिष्टमंडळासोबतच्या अधिकृत भेटी दरम्यानच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वैयक्तिक भेट होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याविषयी सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली., असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास तीस मिनिटं भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.