Dhule Mock Drill Special Report : धुळ्यात पोलिसांचं मॉकड्रिल वेगळंच थ्रिल, एकाला चांगलाच चोप
abp majha web team | 08 Aug 2023 09:45 PM (IST)

धुळ्यामध्ये काल एका मंदीरात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला... शस्त्रास्त्रधारी दहशतवाद्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं... दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या लोकांनी मग सुटकेचा निश्वास टाकला... पण दहशतवाद्यांची ओळख पटल्यावर मात्र भलतंच सत्य समोर आलं... आणि मग मात्र वेगळाच राडा झाला...