Barsu Refinery : बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनामागे कोणती शक्ती? फडणवीसांनी काय आरोप केलेत?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBarsu Refinery : बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनामागे कोणती शक्ती? फडणवीसांनी काय आरोप केलेत?
Devendra Fadnavis On Barsu Protest : कोकणातील बारसू रिफायनरी (Barsu Refinery Protest) आंदोलनाच्या मुद्यावरून विधिमंडळात गदारोळ झाला. राज्यात होत असलेल्या आंदोलनामागे व्यापक कट असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. राज्यात होत असलेल्या विविध आंदोलनात त्याच व्यक्ती दिसत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे असे प्रतिआव्हान आरे वाचवा (Save Aarey) आणि बारसू रिफायनरी विरोधी आंदोलकांनी दिले आहे.
विधान परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बारसू रिफायारी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण उशीर केला त्यामुळे कंपनीने आपली गुंतवणूक पाकिस्तानमध्ये नेली आहे. त्याचा फायदा पाकिस्तानला होतो आहे. आता रिफायनरी होणार आहे. इथं जे प्रकल्पांना विरोध करतात तेच लोकं आरे आंदोलन, नर्मदा आंदोलन, बारसू आंदोलन सगळीकडे दिसतात. हे लोक सातत्यानं बेंगलुरुला जातात आणि त्यांच्या खात्यावर पैसे तिथून येतात, असा आरोप फडणवीस यांनी केला. ग्रीन पीस या स्वयंसेवी संस्थेला बंदी आहे. या संस्थेच्या संपर्कात हे आंदोलक आहेत. त्यांच्याकडून फंडिंग मिळवत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.