Delhi Blast Car : दहशतवाद्यांचा कारनामा, फरीदाबाद पुलवामा कनेक्शन Special Report
abp majha web team | 11 Nov 2025 11:30 PM (IST)
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. या स्फोटात वापरलेल्या i20 कारचा प्रवास फरीदाबादपासून सुरू झाल्याचे तपासात समोर आले असून, तिचे धागेदोरे पुलवामापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून डॉ. उमर मोहम्मदचे नाव समोर येत असून, तो जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद-सहारनपूर मॉड्यूलचा म्होरक्या असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, 'पकडले जाण्याच्या भीतीने डॉक्टरने जाणीवपूर्वक नव्हे, तर गोंधळून जाऊन स्फोट घडवला असावा', असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फरीदाबादमध्ये झालेल्या छापेमारीनंतर डॉ. उमर घाबरला आणि त्याने स्फोटकांनी भरलेली कार दिल्लीत आणली, जिथे हा स्फोट झाला.