Contract Recruitment Special Report : कंत्राटी भरती... सरकारी नोकऱ्याच शिल्लक राहणार नसतील तर.?
abp majha web team | 12 Sep 2023 09:36 PM (IST)
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सध्या आंदोलनांचा भडका उडालाय. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव गावोगावी रस्त्यावर उतरलेत. शिक्षणात आणि सरकारी नोकरीत ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी हा लढा आहे... मराठ्यांच्या या मागणीला ओबीसींचा विरोध आहे... पण हे सगळं ज्यासाठी केलं जातंय तेच राहणार नसेल तर... आणि सरकारी नोकऱ्याच शिल्लक राहणार नसतील तर?