Congress Special Report : अब की बार काँग्रेस फुटणार? काँग्रेस फोडण्याचा डाव कुणाचा?
abp majha web team | 04 Jul 2023 11:26 PM (IST)
कधीकाळी... चला लढूया, चला जिंकूया... अशा धोरणांवर राजकारण केलं जायचं... मात्र आता चला फोडूया, चला जिंकूया.... हे नवं ब्रिदवाक्य महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलंय... अर्थात आधीही फोडाफोडी व्हायच्या मात्र गेल्या वर्षभरात मात्र फोडाफोडींचा नुसता ऊत आलाय... आधी शिवसेना फोडली गेली, आता राष्ट्रवादी फोडली गेली... महाविकास आघाडीच्या वज्रमुठीची बोटं तर सैल होऊन पडली... बरं ही फोडाफोडी करताना, उगा ऐऱ्यागैऱ्या नेत्यांना नाही तर, त्या-त्या पक्षातील बलदंड नेत्यांनाच गळाला लावण्यात आलंय. आता महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांपैकी या फोडाफोडीची झळ काँग्रेसला तुलनेने कमी बसलीय... पण काय सांगावं,,, पुढचा नंबर काँग्रेसचाही लागला तर नवल वाटू नये... पाहूया सविस्तर रिपोर्टमधून...