Congress-VBA Alliance : काँग्रेस-वंचितची नवी आघाडी, नांदेड पॅटर्न यशस्वी होणार? Special Report
abp majha web team Updated at: 12 Nov 2025 10:58 PM (IST)
महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. नांदेड (Nanded) जिल्ह्यात काँग्रेस (Congress) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. 'आमचा दोघांचा एकच हेतू आहे की ज्या प्रकारे जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी सिक्युलर विचारांचे सर्व सहकारी एकत्र येणार नाही तोपर्यंत त्यांना रोखणं अवघड जाईल,' असं म्हणत नांदेडमध्ये या नव्या आघाडीची घोषणा करण्यात आली. मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीतही वंचितसोबत आघाडी करण्याचा सूर उमटला होता, तर काही ठिकाणी महाविकास आघाडी (MVA) म्हणून एकत्र लढण्याचाही प्रस्ताव आहे. नांदेडमधील हा 'समान वाटा' फॉर्म्युला राज्यभर यशस्वी होणार का आणि याचा आगामी राजकारणावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.