SSC Exam : गृहपाठ, तोंडी परीक्षा झालीच नाही, मूल्यमापन कसं? दहावीच्या मूल्यमापनाबाबत संभ्रम कायम
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
29 May 2021 09:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : दहावीच्या परीक्षांसाठी (10th Exam) राज्य सरकारनं (Maharashtra State) आता गाईडलाइन्स ठरवल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याचा अर्थ परीक्षेविना पास होण्याचा मार्ग यंदाच्या 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोकळा झालाय. मात्र परीक्षेविना दहावी पास तर व्हाल पण अकरावीत प्रवेशाचं काय? यासाठीही सरकारनं काही नियम घातले आहेत.