CM Ganpani Bappa Special Report : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बॉलिवूडच्या पाहुण्यांची रिघ
abp majha web team | 25 Sep 2023 11:51 PM (IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी आज बॉलिवूडमधल्या पाहुण्या मंडळींची चक्क रिघ लागली होती. निमित्त होतं अर्थातच गणपतीबाप्पाच्या दर्शनाचं. पण सलमान खान आणि शाहरुख खानसह अनेक सेलिब्रिटींनी वर्षा निवासस्थानी दाखल होऊन गणरायाचं दर्शन घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळं आगामी निवडणुकांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इमेज बिल्डिंग करत असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये सुरु होती.