Gadchiroli Development गडचिरोलीत आरोग्यक्रांती, विकासाच्या महामार्गावर नवे पर्व Special Report
abp majha web team | 08 Nov 2025 10:58 PM (IST)
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले आहे. 'आजपर्यंत आपल्या लोकांना नागपूर, पुणे, मुंबई किंवा हैदराबाद जावं लागायचं, आता आसपासचे लोक इथे येतील,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अंतर्गत, अहेरी येथे १०० खाटांच्या शासकीय महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले, तर सिरोंचा तालुक्यातील राजेश्वरपल्ली येथे १४६८ कोटी रुपये खर्चाच्या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पामध्ये पुण्यातील रुबी रुग्णालयाच्या धर्तीवर ३५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणि सोबतच वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एक मोठे शैक्षणिक संकुल उभारले जाणार आहे. या शैक्षणिक संकुलात स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना ७५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्यात येणार असल्याने आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयीसुविधा दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचणार आहेत.