Climate Change : कोरोना आणि दहशतवादापेक्षाही मोठं संकट! जगभरातील आपत्तींमध्ये इतकी वाढ का झाली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2021 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल क्लायमेट चेंज 2021-दी फिजिकल सायन्स बेसिस प्रसिद्ध करण्यात आला. ज्यात येणाऱ्या काळात पूर, उष्णलहरी, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ, कमी वेळात अधिकचा पाऊस आणि त्याचवेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागात भयंकर दुष्काळी परिस्थितींमध्ये वाढ होणार आहे. त्याचसोबत 21व्या शतकात उष्णतेचे प्रमाण वाढण्याचे आणि थंडीचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.