आधी लॉकडाऊनने जीव घेतला, आता पुराने तडाखा, व्यापाऱ्यांची कुटुंब उध्वस्त, पुन्हा उभं राहण्याचं आव्हान
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
27 Jul 2021 10:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमीनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी बांधणार संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.