Chenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू आणि काश्मिरमध्ये जगातला सर्वात उंच रेल्वे पूल उभारला गेलाय. या पुलाचं काम आता पूर्ण झालं असून लवकरच त्यावर रेल्वेगाडीही दिमाखात धावताना दिसेल.३५९ मीटर उंचीचा हा पूल आर्च ब्रिज अर्थात मनोरा प्रकारातला पूल आहे.२००३ मध्ये या पुलाला मंजुरी मिळाली पण सुरक्षा आणि इतर कारणांमुळं प्रत्यक्ष बांधकाम सुरु व्हायला थोडा उशीर झाला. जुलै २०१७ ला सुरु झालेलं बांधकाम आता पूर्ण झालंय..आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी या पुलावर जाऊन केलेला हा स्पेशल रिपोर्ट..
आयफेल टॉवरपेक्षाही उंच चिनाब पूल
जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला या ब्रिजचे काम सुरु आहे. चिनाब नदीपात्रापासून 359 मीटर उंची वरील ब्रिजचे ओव्हरआर्च डेक लॉन्चिंग गोल्डन जॉइंटसह पूर्ण होईल. गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच अशा या रेल्वे ब्रिजच्या स्टील आर्चचे काम पूर्ण झाले. हा ब्रिज जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीर मधील दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडले जातील. 1315 मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात 10,620 MT स्टीलचा वापर झाला आहे आणि 14,504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे. हा ब्रिज पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असेल
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल
चिनाब नदीवर बांधला जात असणारा हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. नदी सपाटीपासून 359 मीटर उंचीवर असल्याने चिनाब पुलाला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा दर्जा मिळाला आहे. हा पूल फ्रान्समधील आयफिल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्आ महितीनुसार, पुलाच्या संरचनात्मक तपशीलांसाठी 'टेकला' सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल स्टील -10 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकते, असे सांगण्यात येत आहे.