Chandrapur Tiger Special Report : कुणी वाघ घेतं का वाघ? एकट्या चंद्रपुरात 250- 300 वाघ
abp majha web team | 07 Mar 2023 11:59 PM (IST)
कुणी घर देतं का घर हा नटसम्राट नाटकाला अजरामर डायलॉग... चंद्रपूर जिल्ह्य़ात मात्र कुणी वाघ घेतं का वाघ असं म्हणण्याची वेळ आली आहे. याचं कारण म्हणजे २००५ ते २०२२ या १७ वर्षांमध्ये चंद्रपुरात वाघांची संख्या सहा पटीनं वाढली. ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, त्यात कुणाचंच दुमत नाही.. मात्र यानं मानव विरुद्ध वन्यजीव हा जीवघेणा संघर्षही निर्माण झाला.