Cabinet Expansion Disappointment Special Report : खाते वाटपावरुन शिंदे गटात नाराजी?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्न लागलं... कधी रुसवे-फुगवे, कधी एकीच्या आणाभाका घेत, संसाराचं एक वर्ष सरलं... आता वेळ आली घरातल्या कोणत्या जबाबदाऱ्या कुणी घ्यायच्या... त्याची तयारीही झाली... अनेकांनी माळ्यावरची बाशिंगं गुडघ्याला बांधली... कुणी नवे कोट, ब्लेझर शिवायला टाकले... आणि कशाचं काय... तितक्यात एक पाव्हणं आलं... तेही एकटं-दुकटं नाही तर आठजण... शपथा घेत उंबरठे ओलांडले... मात्र, आता घरातली कामं त्यांनाही द्यावी लागणारंचं ना... आंगण कुणाकडं, शेती कुणाकडं, हिसाबा-किताबाचं... इतकंच काय तर, घराच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडं द्यायच्या... यावरून आता कलगितुरा रंगलाय... मंडळी ही काही कुठच्या मालिकेतलं कथासूत्र नाहीय... तर हे आहे महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाचं... आधीच मिटतं नव्हतं आणि त्यात आता नवं पाव्हणं... त्यामुळे... घरचं झालं थोडं आणि व्ह्यायाने धाडलं राजकीय घोडं... असं सगळं होऊन बसलंय.