Shegaon Buldhana : सेवा हीच साधना! शेगावचे कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या कार्याची गाथा
संजय महाजन, एबीपी माझा | 08 Aug 2021 07:21 PM (IST)
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान हे सोन्याचांदीच्या मूर्त्यांमुळे नाही तर स्वच्छतेमुळे संपूर्ण जगात ओळखलं जात. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थानाच्या यासर्व बाबींचा वसा व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी काटेकोरपणे राबविला.. म्हणूनच शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवण्यात येतंय.