Beed Special Report आष्टी मतदारसंघात लक्ष घालणार, Pankaja Munde यांची घोषणा, मुंडे वि. धस वाद पेटला
abp majha web team | 02 Nov 2025 10:18 PM (IST)
बीड जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे, ज्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची किनार आहे. 'आष्टी मतदारसंघात आपण लक्ष घालणार,' अशी थेट घोषणाच मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्याने या वादाची ठिणगी पडली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी माजी खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) गेवराई आणि माजलगावमध्ये लक्ष घालतील असेही जाहीर केले. यानंतर दोन्ही नेत्यांमधील जुना वाद पुन्हा समोर आला असून, एकमेकांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची भाषा वापरली जात आहे. धस यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपला प्रचार केला नसल्याचा आरोप केला होता, तर आता पंकजा मुंडे यांनी धस यांच्याविरोधात थेट पक्षनेतृत्वाकडेच तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे, ज्यावर आपणही लेखी उत्तर देऊ असे धस यांनी म्हटले आहे.