Be Positive: विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी मुंबईतील मुख्याधापिकेची धडपड, 5महिन्यात जमवले 40लाख रुपये
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : फी साठी विद्यार्थ्यांना तगादा लावणाऱ्या शाळांच्या अनेक तक्रारी पाहायला आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना रोजगार नसल्याने फी भरणे शक्य नव्हतं. अशा विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकीने धडपड करत आहे. एकही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका मोहिमेतून 40 लाख जमा करून 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वर्षभराची फी तर भरलीच शिवाय शिक्षकांचा पगारसुद्धा दिला आहे
मागील वर्षी लॉकडाऊन लागलं आणि शाळेत शिक्षणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांच्या रोजगारावर परिणाम झाला. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यावर अनेक विद्यार्थी फी भरू शकत नसल्याने ऑनलाइन क्लासला हजेरी लावत नसल्याचं लक्षात आला. तर काही विद्यार्थ्यांनी गावी जाऊन फी भरता येत नसल्याने यावर्षी शाळा शिकायचं नाही ठरवलं. हे जेव्हा पवई मधील पवई इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका शर्लिन उदयकुमार यांच्या लक्षात आले तेव्हा त्यानी शाळेतील गरीब मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी इतरांकडून पैसे जमा करायचं ठरवलं.
विद्यार्थ्यांच्या फी चे पैसे जमा करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाद्वारे मोहीम सुरू करत लोकल मॅगजीनमध्ये जाहिरात दिली. काही कंपन्यांशी संपर्क केला. मात्र सुरवातीला कोणाकडूनच पैसे आले नाही. त्यानंतर हळूहळू सीएसआर फंड, सामाजिक संस्था आणि काही दानशूर व्यक्तीकडून मदतीचा ओघ यायला लागला आणि 5 महिन्यात या बाईनी 40 लाख रुपये आपल्या विद्यार्थ्यांच्या फी साठी जमवले. यामध्ये फी सोबत शिक्षकांच्या पगारी सुद्धा देण्याचं काम त्यांनी केलं
महामारीचा संकट अजूनही पूर्ण गेलेला नाही त्यामुळे लॉकडाऊन काळात आजही फी भरणे विद्यार्थ्यांना कठीण जाताय. त्यामुळे अजूनही मदतीचा ओघ सुरू असून विद्यार्थ्यांचे शिक्षण फी न घेता सुद्धा सुरू आहे. कारण फी चा मुद्दा महत्वचा नसून शिक्षण देणे हेच शिक्षकांचा आणि शाळांचा आद्य कर्तव्य असल्याच शाळेतील शिक्षकांचा म्हणणं आहे. मुख्याध्यापिका शर्लिन उदयकुमार यांच्या या कामामुळे पालकांनी सुद्धा या प्रसंगात साथ दिल्याने मनापासून आभार मानले आहे.
शाळेत फी साठी तगादा लावणाऱ्या, प्रसंगी फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासला बसू न देणाऱ्या शाळा अलीकडच्या काळात पहिल्या. मात्र या शाळेत फी साठीच या शाळेच्या मुख्याध्यापिका बाईंनी धडपड करत पैसे जमवून शिक्षण देणेच हे आद्य कर्तव्य असल्याच सांगत इतर शाळांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.