Bappi Lahiri : Disco King काळाच्या पडद्याआड, गायक, संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन
abp majha web team | 16 Feb 2022 11:06 PM (IST)

Bappi Lahiri Passes Away: प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (Obstructive Sleep Apnea) नावाच्या आजाराने झाला. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून या आजाराचा सामना करत होते. कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी या आजाराचे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल. हा आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि तो कसा टाळावा, हे जाणून घेऊया.