Banjara Reservation : बंजारा आरक्षणावरून आदिवासी समाज आक्रमक Special Report
abp majha web team | 15 Sep 2025 09:54 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर आता बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचे भव्य मोर्चे निघाले. या मोर्चांना एका नेत्याने पाठिंबा दिला. "या बंजारा समाजाला सुध्दा एसटीचं आरक्षण सरकारने विचार करावा लागेल. भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुध्दा प्रयत्न करेल," असे एका नेत्याने म्हटले. काँग्रेस आमदार राजेश राठोड आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी महिनाभरात मागणी पूर्ण न झाल्यास मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. दुसरीकडे, हिंगोली आणि नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाने बंजारा समाजाच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवला. आदिवासी पँथर संघटनेने मोर्चे काढले. आदिवासी समाजाने बंजारा आणि धनगर समाज आदिवासी आरक्षणात घुसखोरी करत असल्याचा आरोप केला. तसेच, बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका न्यायालयात दाखल करण्याचा इशाराही दिला. मराठा आरक्षणाचे वादळ शांत झाल्यानंतर आता बंजारा समाजाची मागणी आणि आदिवासी समाजाचा विरोध हे सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा तापला आहे.