MVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रिपदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रिपदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?
100 टक्के काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, बाळासाहेब थोरातांकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त, तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य...
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी थोडी माघार घेतल्याचं चित्र असतानाच, आता १०० टक्के काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास व्यक्त केलाय... आणि त्यामुळेच महाविकास आघाडीत आता वादाची चिन्ह निर्माण झालीयत... पण तरीही हा वाद शरद पवार यांची संख्याबळाची भूमिका मिटवेल का? हा खरा प्रश्नय... पाहूयात...
संगमनेर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) 125 जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागावाटप देखील लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केलाय. गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav 2024) चर्चा करून सर्वांच्या सहमतीने जागावाटप पूर्ण होईल. एमआयएमबाबत (MIM) प्रस्ताव आल्याची मला माहिती नाही. मात्र, जे काही निर्णय होतील ते उच्च पातळीवर होतील असं थोरात यांनी स्पष्ट केलंय. तर विधानसभा निवडणुकीत 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असेही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमच्या दोन-तीन बैठका आत्तापर्यंत झाल्या आहेत. या बैठकीमध्ये 125 जागांवर सहमती असल्यास दिसून आलंय. इतर जागांवर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. एमआयएमबाबत कोणता प्रस्ताव दिलाय याची मला माहिती नाही. मात्र असं काही असेल तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. आमचे जागा वाटप लवकरच पूर्ण होईल आणि राज्यात महाविकास आघाडी 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.