Bachchu Kadu On Cabinet Expansion Special Report : बच्चू कडू यांच्या मनात नक्की काय चाललंय...
abp majha web team | 13 Jul 2023 11:12 PM (IST)

अजित पवारांना अर्थखातं मिळू नये यासाठी आग्रही भूमिका घेणारे आणि मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडूंची भूमिका आता मवाळ झाल्याचं दिसतंय... राष्ट्रवादीच्या सरकारमधील सहभागानंतर बच्चू कडू रोजच आपला संताप व्यक्त करत होते.. मात्र आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कडूंची भाषा अचानक गोड झाली... मुख्यमंत्री शिंदेंशी बोलून ते आपली भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत.. मात्र बच्चू यांची कडू भूमिका अचानक गोड कशी झाली? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय.