Amit Thackeray Toll Naka Special Report : ठाकरेंना अडवलं, टोलनाक्याला फोडलं, टोलनाक्यावर मनसेचा राडा
abp majha web team
Updated at:
23 Jul 2023 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी ठाणे-भिवंडी टोल नाक्यावर मनसेचा खळ्ळ खट्याक..तर कधी कोल्हापुरात किणी टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन. टोल नाका आणि मनसेच्या आंदोलनाचं समीकरण अनेकदा महाराष्ट्राने पाहिलंय. आजवर ६५ टोलनाके राज ठाकरेंच्या नैतृत्वाखाली मनसेने बंद पाडलेत.. हा आकडा आम्ही सांगत नाही तर खुद्द अमित ठाकरेंनीच आपल्या एका प्रतिक्रियेत हा आकडा सांगितलाय. आणि हो यात आता आणखी एका टोलनाक्याची भर पडलीये. हा टोलनाका आहे समृद्धी महामार्गावरचा..नाशिकच्या गोंदे फाट्याजवळ्याच्या टोलनाक्यावर मनसेने का खळ्ळ खट्याक केलं पाहूया या रिपोर्टमधून..