Anjali Damania VS Ajit Pawar : व्यवहार थांबला, पण वाद पेटला! दमानिया वि. अजित पवार.. Special Report
Anjali Damania VS Ajit Pawar : व्यवहार थांबला, पण वाद पेटला! दमानिया वि. अजित पवार.. Special Report
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पार्थ पवार आणि अजित पवारांवरील आरोपांचा हल्ला आणखी तीव्र केलाय. जमीन खरेदी गैरव्यवहारातून पार्थ पवारांना जाणीवपूर्वक वाचवलं जात असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी टॉवर लोकेशन आणि सीडीआर काढण्याचीही मागणी केलीय. तर राष्ट्रवादीकडून दमानियांवर पलटवार करण्यात आल्यामुळं हा संघर्ष भविष्यात अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळतायत. आज दिवसभरात नेमकं काय घडलं, पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून.
दमानिया विरुद्ध अजितदादा वादाचा हा आहे पुढचा अंक. परदेशवारीवरून परतलेल्या दमानियांनी आता अमेडिया कंपनीच्या व्यवहारांचा मुद्दा ऐरणीवर घेतलाय. पार्थ पवार आणि त्यांचे वडील अजित पवार सध्या दमानियांच्या टार्गेटवर आहेत. अमेडिया कंपनीच्या लोकांनी सरकारी यंत्रणेवर कसा दबाव आणला, हे सांगत दमानियांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
अजित पवारांच्या राजीनामा ही मागणी दमानियांनी यापूर्वीही केलीय. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक नवी मागणी केलीय.
तर नव्यानं प्रवक्तेपदाची जबाबदारी पदरात पडलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानियांचा जोरदार समाचार घेत त्यांच्यावर पलटवार केलेत. अहवाल सरकारकडं जाण्याआधी दमानियांकडं कसा येतो, असा सवाल करत सूरज चव्हाणांनी या वादात वेगळाच अँगल समोर आणायचा प्रयत्न केलाय.