Damania VS Munde : दमानिया वि. मुंडे; आरोप - प्रत्यारोपांचे फंडे Rajkiya Sholay Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतोष देशमुख हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या मंडळींची यादी बरीच मोठी आहे... मात्र त्या यादीमध्ये सर्वात आघाडीवर आहेत त्या अंजली दमानिया... आता अंजली दमानियांनी सरपंच हत्याप्रकरणाबरोबरच कृषी घोटाळ्यावरून धनंजय मुंडेंना लक्ष केलंय.. पावणेतीनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप अंजली दमानियांनी लावला आहे.. तर धनंजय मुंडेंनी देखील तेवढ्याच जोरकसपणे दमानियांना उत्तर दिलंय...वाग्युद्धाचा पहिला अंक आज पार पडला असला तरी येत्या दिवसात याचे वेगवेगळे अंक पाहायला मिळणार आहेत...
अंजली दमानिया कोणता बॉम्ब फोडणार? याची उत्सुकता सोमवारपासून ताणली गेली होती...
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडेंशी कसे जोडले गेलेत?, हे पटवून देण्यासाठी अंजली दमानियांचे अथक प्रयत्न सुरू आहेत..
मात्र देवाभाऊ आणि अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही म्हटल्यानंतर अंजली दमानियांनी ब्रह्मास्त्र काढायचं ठरवलं
पूर्णतयारीनिशी आलेल्या अंजली दमानियांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंवर पाणवेतीनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला.
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना साहित्य खरेदीत कसा घोटाळा झाला? याची आकडेवारी दमानियांनी सादर केली...
मी अभिमन्यू नव्हे तर अर्जुन आहे, असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंनी देखील दमानियांचे वार परतवून लावण्यासाठी जोरदार पलटवार केले
धनंजय मुंडेंकडून खरेदी घोटाळा? HEAD
1. नॅनो युरिया : 220 किंमतीच्या 19,68,408 बॉटल विकत घेतल्या
2. नॅनो DFA : 590 रुपयाने 19,57,438 बॉटल विकत घेतल्या.
3. बॅटरी स्प्रे : 3426 रुपयाने 2,36,427 स्प्रे विकत घेतले.
4. मेटाल्डिहाईड (PI Industries Petant Product) : 1275 रुपयांनी 1,96,000 किलो विकत घेतलं.
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 1250 रुपयांनी 6 लाख 18 हजार बॅग घेतल्या
मालाची खरी किंमत किती?
1. नॅनो युरिया : 90 रुपये
2. नॅनो DFA : 269 (500 ML) रुपये
3. बॅटरी स्प्रे : 2450 ते 2946 रुपये
4. मेटाल्डिहाईड : 817 रुपये
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 20 बॅग 577 रुपये