पगारकपात कंपनीला पडली महागात, संतप्त कर्मचाऱ्यांनी काचा फोडल्या, संगणक-लॅपटॉपचं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Dec 2020 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनमानी पद्धतीनं पगार कपात केल्याचा आरोप करत आयफोनच्या पार्ट्सची निर्मिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच आपल्या कंपनीत तोडफोड केलीए. शनिवारची ही घटना असून, पगार कपात आणि वेळेवर वेतन देत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी तोडफोड केली. विस्टॉर्न कंपनीत आयफोन- ७, लेनोव्हो, मायक्रोसॉफ्टसाठी अनेक आयटी उत्पादनं बनवली जातात. या कंपनीचं मुख्यालय तैवानमध्ये आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीत विस्टॉर्न कंपनीचं ४३७ कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी १२८ जणांना बेड्या ठोकल्यात.