Amravati Marriage : प्रेमात ठरला 'बाजीगर', अंध प्रेमीयुगुलाची डोळस कहाणी
प्रणय निर्बाण, एबीपी माझा | 24 Dec 2021 03:47 PM (IST)
Amravati News : प्रेम म्हणजे, प्रेम असतं... प्रेमाच्या अनेक व्याख्या आहेत. प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. प्रेमाचे भन्नाट किस्सेही आपण नेहमीच ऐकतो. प्रेम आंधळं असतं असंही म्हटलं जातं. अशाच एका प्रेमाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही गोष्ट आहे अमरावतीत राहणाऱ्या एका तरुणाची. हा तरुण स्पर्धेत हरला पण प्रेमात जिंकला. या प्रेमकहानीतील एक महत्त्वाची बाब म्हणजे, या गोष्टीतले तरुण-तरुणी दोघेही दृष्टीहीन आहेत. पण त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा डोळसपणा मात्र सर्वांची मनं जिंकून जातो.