Pandharpur Ashadi Wari : पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांचा विरोध, एसटीतून पालखी नेण्याची मागणी
नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड
Updated at:
11 Jun 2021 01:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर : यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याचं स्वरूप कसं असेल, याचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. राज्यातील नऊ पालखी सोहळा प्रमुखांनी पायी वारीचा प्रस्ताव ठेवलाय. पण देवाच्या आळंदीतील ग्रामस्थांनी मात्र याला विरोध दर्शविला आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करायचं नसेल तर एसटीतूनच हा सोहळा पंढरपूरला नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी राज्य सरकारकडे केली आहे.