Jain Samaj Protest Special Report : गल्लीपासून दिल्लीपर्यंत जैन समाज रस्त्यावर, मुंबईतही आंदोलन
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 10:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझारखंडमधलं जैन समाजाचं तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी परिसराला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या विरोधात सकल जैन समाजाकडून आज मुंबईतही निषेध व्यक्त करण्यात आला. मुंबईतल्या आझाद मैदानात जैन समाजाकडून तीर्थ बचाव महासभेचं आयोजन करून त्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. सम्मेद शिखरजी हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचं सांगत जैनबांधव हजारोंच्या संख्येनं आझाद मैदानावर एकत्र आले होते. त्यामुळं दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. श्री सम्मेद शिखरजी परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या अनेक शहरांमध्ये सध्या आंदोलनं सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या तीव्र भावनांचं प्रतिबिंब मुंबईतही उमटलं.