NAGPUR: 208 वर्ष जुने पिंपळाचे झाड वाचवण्यासाठी सरसावले आदीत्य ठाकरे
abp majha web team
Updated at:
05 Dec 2021 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'झाडे लावा, झाडे जगवा' हा नारा देताना अनेकजण दिसतात, पण यासाठी उपाययोजना मात्र फार कमी केल्या जातात. पण आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मात्र नागपूरमधील एक 208 वर्ष जुने पिंपळाचे झाड वाचवण्यासाठी सरसावले आहेत. संबधित झाड कापण्याची महापालिकेकडे घनश्याम पुरोहित नावाच्या व्यक्तीने परवानगी मागितली होती. मात्र ही बातमी आदित्य ठाकरेंच्या कानावर येता त्यांनी स्वत:हून हे झाड वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. स्थानिक प्रशासनाला त्यांनी तसा संदेशही पाठवला आहे.