Adipurush Dialogue Special Report : आदिपुरुष सिनेमातील संवाद बदलणार, टीकेची झोड, निर्मात्यांना उपरती
abp majha web team | 19 Jun 2023 11:29 PM (IST)
५०० कोटींचा खर्च..मल्टिस्टारर..३ वर्षांची प्रतीक्षा..हजारो कलाकारांची मेहनत...या सगळ्यातून तयार झाला रामायणावर आधारित आदिपुरुष सिनेमा..मोठा गाजावाजा करत आदिपुरष सिनेमागृहात दाखल झाला...वाटलं होतं सिनेमा दमदार असेल...पण प्रत्यक्षात या सिनेमाने सिनेप्रेमींची घोर निराशा केलीये. प्रेक्षकांनी या सिनेमाचं वर्णन ठणठण गोपाळ असंच केलंय...आणि त्याला कारण ठरतायत ते या सिनेमातील डायलॉग...सिनेमावरुन वादाचा ट्रेलर सुरु होताच संवाद लेखकाने एक मोठा निर्णय घेत वादाचा दि एन्ड करण्याचा प्रयत्न केलाय...आता याने वादाचा एंड होणार की इंटरवलनंतर पुन्हा नवा अंक सुरु होणार पाहूया या रिपोर्टमधून...