Adhalrao Patil vs Amol Kolhe : आढळराव पाटील दादा गटातून अमोल कोल्हेंविरोधात लढणार? Special Report
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 07:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हे कारकीर्दीच्या सुरुवातीपासून बाळासाहेब ठाकरेंसोबत होते. २०२२ साली शिंदेंच्या बंडानंतर आढळराव शिंदे गटात गेले. म्हणजे आता आतापर्यंत आढळराव हे अजित पवारांचे विरोधकच होते. तसं तो बोलूनही दाखवायचे.. अजितदादांवर नेहमी सडकून टीका करायचे. मात्र आता त्यांची भाषा अचानक बदलली आहे. आढळराव चक्क अजितदादांचं कौतुक करू लागलेत. त्यामुळे आढळराव पाटलांची अजितदादांच्या तिकीटावरही लढण्याची तयारी आहे का, अशी चर्चा आता शिरूरमध्ये रंगू लागली आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.