Voter List Scam : मविआचे मतचोरीचे आरोप खरे की खोटे? ABP Majha रियालिटी चेक Special Report
abp majha web team | 16 Oct 2025 09:58 PM (IST)
बोगस मतदार यादीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे, ज्यावर 'एबीपी माझा'ने 'रियालिटी चेक' केला आहे. ‘हे सगळे पुरावे आहेत ना जोडलेले आहेत, मोकळं बोलत नाही,’ असे म्हणत जयंत पाटलांनी नाशिकमधील एका घरात ८१३ मतदार असल्याचा दावा केला. आमचा प्रतिनिधी नाशिकच्या पत्त्यावर पोहोचला असता, तिथे तीन वर्षांपासून एक नवीन इमारत असून घरमालकाने हा दावा खोटा असल्याचे सांगितले. दुसरीकडे, राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या चारकोपमधील १२४ वर्षीय नंदिनी चव्हाण आणि ४३ वर्षीय वडील महेंद्र चव्हाण हे पती-पत्नी असल्याचे समोर आले. नंदिनी यांचे वय आणि आडनाव निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे बदलले. यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी हे प्रकार २०१२-१३ मधील असून यात सर्वाधिक मुस्लिम नावे असल्याचा दावा केला आहे. आता निवडणूक आयोग या गंभीर चुकांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.