BMC Vaccination : लशीचा पहिला डोस घेऊन नागरिक गायब? मनपा 50 ते 60 हजार नागरिकांच्या शोधात
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
11 Jun 2021 12:09 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुंबईत जलदगतीने कोरोना लसीकरण व्हावं यासाठी अनेक उपाय आजमवले जातायेत. मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा नसल्यानं आधीच लसीकरणाची गती मंदावली आहे. त्यात आता मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. मुंबईत 50 ते 60 हजार लोक असे आहेत, ज्यांनी लसीचा पहिला डोस तर घेतला मात्र मुदत संपल्यानंतरही दुसरा डोस घेण्यासाठी ते केंद्रांवर पोहोचलेच नाहीत.