अहमदनगरमधील अमरधाम स्मशानभूमीत एकाच दिवशी 42 जणांवर अंत्यसंस्कार, सरणही थकले मरण पाहुनी..
निखील चौकर, एबीपी माझा | 09 Apr 2021 06:58 PM (IST)
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्याप्रमाणे कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढतेय त्याप्रमाणे आता कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. काल अहमदनगर मध्ये एकाच दिवशी 42 रुग्णांचा मृत्यू झालाय. या सर्व रुग्णांवर अहमदनगर च्या अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व मृतदेह एकापाठोपाठ एक जळत होते. हे दृश्य मन सुन्न करणारे होते.