Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकच्या दुर्दैवी घटनेनंतरच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या, प्राणवायुनेच घेतले 24 रुग्णांचे प्राण!
राजू सोनावणे
Updated at:
23 Apr 2021 12:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.