नाशिकमध्ये 1456 वाडे, इमारती धोकादायक, नाशिक महापालिकेला जाग कधी येणार? कारवाई कधी होणार?
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
11 Jun 2021 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर तरी नाशिक महापालिकेला जाग येणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण नाशिकमध्ये सध्या तब्बल 1456 जुने वाडे, इमारती आणि घरे धोकादायक असून या मिळकतींना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शहरातील जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात अशा धोकादायक मिळकतींचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होताच नाशिकमध्ये जुनी घरं कोसळण्याच्या घटना या समोर येत असतात, आजपर्यंत अनेकांचे यात जीवही गेले आहेत मात्र महापालिकेकडून नोटीस देण्याव्यक्तीरिक्त कुठलीही ठोस कारवाई होतांना दिसून येत नाही.