क्रीडापटू साक्षी दाभेकरच्या स्वप्नावर 'दरड', चिमुरड्याला वाचवताना पाय गमावला, तुमच्या मदतीची गरज...
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई Updated at: 01 Aug 2021 08:36 PM (IST)
यावर्षी महाराष्ट्रावर आलेल्या अस्मानी संकटानं अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा केला. रायगडमधल्या एका छोट्याशा गावात रहाणाऱ्या 14 वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या डोळ्यातलं क्रीडापटू होण्याचं स्वप्नंही कायमचं विझलंय. जेव्हा रायगडमध्ये मृत्यूंचं थैमान सुरू होतं त्यावेळी एका लहानग्या बाळाला वाचवायला गेलेल्या साक्षीच्या पायावर भिंत पडली आणि तिनं तिचा एक पाय कायमचा गमावला.