Top Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 10 AM : 28 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवघ्या काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेल्या मंत्र्यांच्या बंगले आणि कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी, रंगरंगोटीसाठी कागदोपत्री निविदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उधळपट्टीचा माझाकडून पर्दाफाश.
नव्या आघाडीची आज मुंबईत चर्चा, संभाजीराजे, बच्चू कडूंसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक, राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवली जाणार.
राज्यसभेत भाजप झाला सर्वात मोठा पक्ष, एनडीएची राज्यसभेतील सदस्यसंख्या ११५ वर, तर भाजपचे राज्यसभेत ९६ सदस्य.
महाविकास आघाडीची आज 'मातोश्री' निवासस्थानी तातडीची बैठक, उद्धव ठाकरेंसह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत उपस्थित राहणार.
राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरुन आज महाविकास आघाडीचे आंदोलन, आदित्य ठाकरेही मालवणला जाऊन आंदोलनात सहभागी होणार.
पुतळा शिल्पकार जयदीप आपटे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, शिल्पकार आणि कन्सल्टंट यांनी निकृष्ट उभारणी केल्याचा ठपका.
मालवणमधील पुतळा अपघातप्रकरणी सार्वजनिक बांधकाममंत्री, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आमदार वैभव नाईक यांची मागणी, 'पुतळा दुर्घटनेतील दोषींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न', वैभव नाईक यांचं वक्तव्य.