Sunil Kendrekar : शेतकऱ्यांनी जीवन संपवण्यापासून कसं रोखणार? सुनील केंद्रेकरांनी दिलाय मोलाचा सल्ला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील सर्व तमाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांना रबी आणि खरीप पिकाच्या पेरणी वेळी प्रत्येकी 10 हजार रुपये दिले पाहिजेत, असा निष्कर्ष महाराष्ट्र सरकारच्याच एका सर्वेक्षणातून समोर आला आहे.. औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ५ लाख शेतकरी कुटुंबांचं सर्वेक्षण करून घेतलं. मराठवाड्यातील शेतकऱ्याला जगवायचं असेल, त्याला आत्महत्या करण्यापासून रोखायचं असेल तर दोन्ही पेरण्यांवेळी प्रत्येक शेतकऱ्याला १० हजार रुपये सरकारनं दिले पाहिजेत, अशी शिफारस केंद्रेकर राज्य सरकारला करणार आहेत. महाराष्ट्र शासनातील एका अधिकाऱ्यानं असं म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे, सरकार त्यांची शिफारस मान्य करणार का, ते पाहावं लागेल.