Saat Barachya Batmya 712 : संपूर्ण राज्याचे डोळे आभाळाकडे, पाऊस रुसलेलाच ABP Majha
abp majha web team | 27 Aug 2023 09:49 AM (IST)

दिवस पावसाळ्याचे... त्यात श्रावण महिना... या दिवसांत भवताल भिजलेला आणि त्याला पावसाच्या धारांचा साज असतो... यंदा मात्र आक्रित घडलंय... नजर जाईल तिथवर ओसाड माळरान... भेगाळलेली शेती आणि तग धरून अर्धमेली झालेली पिकं... धरणं उघडी पडलेली, विहिरींचाही जीव तळाशी गेलेला आणि खपाटीला पोट गेलेली जनावरं... संपूर्ण वातावरणात कोरड... मात्र डोळ्यांत पाणी... म्हणूनच, प्रत्येकजण पावसाची वाट पाहतोय... वरूणराजाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रात कशी परिस्थिती झालीय, पाहूया या रिपोर्टमधून...