Saat Barachya Batmya : 7/12 : ब्लॅक क्वीन बेरी द्राक्ष ते हळदीची आवक शेती क्षेत्रातील प्रत्येक बातमी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSaat Barachya Batmya : 7/12 : ब्लॅक क्वीन बेरी द्राक्ष ते हळदीची आवक शेती क्षेत्रातील प्रत्येक बातमी. पलूस तालुक्यातील सावंतपूर मधील जयकर माने या प्रयोगशील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांने काळ्या द्राक्षाचा नवीन वाण विकसित केलाय.'ब्लॅक क्वीन बेरी' असे या द्राक्षांच्या नव्या वाणाला नाव दिलं आहे. दहा वर्षे वेगवेगळे प्रयोग करून जयकर माने यांनी हा नवीन वाण विकसित केला आहे. त्यांना दिल्ली नॅशनल रिसर्च सेंटरचे पेटंटही मिळले आहे. रोगाला बळी न पडणारी, चांगलं उत्पादन देणारी आणि बाजारपेठेत मागणी असणारी द्राक्षाची जात विकसित करण्याचा प्रयोग २०१२ पासून त्यांनी सुरू केला होता. या वाणाला त्यांनी आपलं कुलदैवत आणि ग्रामदैवत यांच्या नावानुसार आणि इंग्लिश मध्ये नाव असावं या हेतूनं ब्लॅक क्वीन बेरी असं नाव दिलं. याच नवीन वाणाची तीन एकरात त्यांनी लागण केली आहे. या द्राक्षाच्या मण्याची साल पातळ आहे, ऍसिडचे प्रमाण कमी असल्याने द्राक्षात गोडी जास्त आहे तसंच अन्य वाणाच्या तुलनेत या वाणावर रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याचं ते सांगतात.